सैफी इस्पितळातील कामगारांच्या प्रश्नांवर जोपर्यंत ठोस आणि सकारात्मक निर्णय इस्पितळ प्रशासन घेत नाही, तोपर्यंत कायदा हातात घेत रहाणार" - गजानन राणे

जनदूत टिम    08-Nov-2020
Total Views |

मुबंई : सैफी इस्पितळात सुरक्षा रक्षक आणि कँटीन सेवा देणाऱ्या कंत्रातदाराचे पुनश्च तेच रडगाणं! गेल्या १४ वर्षांपासून सैफी इस्पितळात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन आहे बरेच कंत्राटदार या १४ वर्षात आले आणि गेले, पण कामगार मात्र तेच राहिले. परंतु गेल्या वर्षभरात आलेल्या नवीन कंत्राटदारांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे ०४ वेळा कामगारांना आंदोलन करण्याची वेळ आली, बेमुर्तवत व्यवस्थापन आणि कंत्राटदारांनी कामगार कायदा बासनात बांधून ठेवला आहे.

Rane_1  H x W:


०2 महिन्यांपूर्वी सैफी व्यवस्थापन, कंत्राटदार, युनियनचे पदाधिकारी यांची स्थानिक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस कमिशनर यांच्या समोर झालेल्या बैठकीत कोरोना च्या कालावधीत कामावर येऊ न शकलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु, केवळ कामगारांची उपासमार व्हावी म्हणून व्यवस्थापन आणि कंत्राटदाराने जाणीवपूर्वक कामगारांना कामावर घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत ह्यासाठी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज श्री. गजानन राणे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली सैफी इस्पितळ येथे आंदोलन आले.

तदनंतर सैफी इस्पितळाचे ट्रस्टी. बपयी, आणि मेडिकल संचालक डिसा यांनी आज दुपारी कंत्राटदार सोबत कामगार सेनेची बैठक आयोजित करून कामगारांना कामावर घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करायचे आश्वासन दिले.