नवीन घोलप यांची मनसे शहराध्यक्षपदी निवड!

जनदूत टिम    26-Nov-2020
Total Views |
जव्हार : जव्हार शहरातील तरुण सामाजिक कार्यकर्ते नवीन घोलप यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जव्हार शहर अध्यक्ष पदी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

Navin Gholap_1   
 
नवीन घोलप हे सामाजिक कार्यात तसेच हिंदू सण उत्सव साजरे करण्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जव्हार शहरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडी बद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगीतले की,सन्मानिय राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेले लोकसेवेचे काम माझ्या हातून प्रामाणीक पणे घडेल व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीसाठी विशेष प्रयत्न करीन.