पानगावात रस्ता दुरुस्तीसाठी एक तास रस्ता रोको आंदोलन

जनदूत टिम    06-Oct-2020
Total Views |

- पानगाव विकास क्रती समीतीचा पुढाकार
-  १०० अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर आसलेला उमरगा खामगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ असलेला पानगाव येथील अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे गेट दरम्यान दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडलेले काम तात्काळ करा या मागणीसाठी पानगाव विकास क्रती समीतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला व दोन आमदारांना निवेदन देण्यात आले होते परंतू मागणीची दखल घेतली नसल्याने पानगाव विकास क्रती समीतीच्या वतीने ता.५ सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी १० ते ११ एक तास पानगाव विकास क्रती समीती चे अध्यक्ष सुर्यकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पानगाव येथील महावितरण कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 
Pangaon_1  H x
 
रेणापूर तालुक्यातील पानगाव हे गाव जवळपास विस ते पंचविस हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असून या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौत्यस्मारक,साखर कारखाना,आईलमील, हेमाडपंथी विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून या गावची मोठी बाजारपेठ पेठ आसल्याने याच बाजारपेठेवर पानगाव सह परीसरातील बारा वाडी खेड्यांचा आर्थीक कारभाराची पानगाव हिच मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी दैनंदीन व्यावहारासाठी मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस दिवस गर्दी होत आहे. आणी या ठिकाणचा रहदारीचा रस्ता माञ पुर्ता खड्ड्यात गेला असून या ठिकाणीयेजा करण्यासाठी वाहनधारक आणी प्रवाशी पुर्ते हैराण झाले आहेत.या गावातील दिड किलोमीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी जवळपास अर्धा तास वेळ लागतो आहे. तरीही गावात असलेले विविध पक्ष संघटनेचे पुढारी, नेते ,कार्यकर्ते या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढे येण्यास धजावणार नसल्याने अखेर हा प्रश्र्न मार्गी लागावा म्हणून पानगाव विकास क्रती समीती ने पुढाकार घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सर्वप्रथम दि.२९ जून २०२० रोजी पानगाव बंद व येथील ३३ केंव्ही समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.तेंव्हा लागलीच दोन दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्र्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिले होते.तात्पूरता रस्ताही दुरुस्ती करुन आंदोलन कर्त्यांना दिलासा दिला परंतू पुन्हा जैसे थे आसा झाल्याने पुन्हा हा रस्ता डांबराने व खडीने दुरुस्त करुन देण्याचे आश्र्वासन दिले होते ते काम अद्याप झाले नाही. म्हणून ता.५ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा हा रस्ता दुरुस्त करा या मागणीसाठी पानगाव विकास क्रती समीतीच्या वतीने सुर्यकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
 
दरम्यान आंदोलनाला भेट देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता एन एम कोसूळकर,सहाय्यक अभियंता श्रेणी २ चे प्रल्हाद सल्लाही यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन कर्त्यास लेखी आश्र्वासन दिले की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ पानगाव येथील अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वे गेट दरम्यान दिड किमीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे अंदाजपञक तयार करुन राष्ट्रीय महामार्ग परीमंडळ कोकण भवन मुंबई येथे मंजूरीसाठी पाठवले असून सदर कामाची निवीदा प्रक्रीया चालू आहे.निवादा सात दिवसांची लावली असून निवीदा उघडल्यानंतर व कंट्रातटदार निश्चीत झाल्याच्या नंतर दिवस महीण्याच्या आत कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्र्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता एम एन कोसूळकर यांनी दिल्यावरुन हे आंदोलन मागे घेण्यात आले.या वेळी. पानगाव विकास क्रती समीतीचे अध्यक्ष सुर्यकांत चव्हाण, रंगनाथ डोणे, मधुकर गालफाडे, धनंजय चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य गोपाळ शेंडगे,शिला आचार्य, राजाभाऊ गालफाडे, अॅड राजकुमार कांबळे, अनिल धर्माधिकारी,पञकार सुधाकर फुले,बालाजी कस्तूरे, मयूर चव्हाण, निळकंठेश्वर चव्हाण,दत्ता गुडदे,जाकीर मनियार,अमोल कुरे,राम वालेकर, नारायण हणवते, आदी सह गावातील प्रतिष्ठीत नागरीक ,व्यापारी मोढ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून अंतर पाळून हे आंदोलन शांततेत पार पडले.