नवतरुण शेतकऱ्यांनी केली राजदूत गाडीपासून केली ट्रॅक्टरची निर्मिती

जनदूत टिम    05-Oct-2020
Total Views |
सोलापूर : इच्छाशक्ती असल्यानंतर माणूस आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो व एव्हरेस्ट शिखर सुद्धा सर करू शकतो याची आपण आतापर्यंत अनेक उदाहरणे पाहिली आहेत त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये हे असे अनेक नवतरुण युवक होऊन गेले की त्यांनी सर्व भारतापुढे एक आदर्श घालून दिला आहे.
 
Sol0245_1  H x
 
हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील एका गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या बुद्धी कौशल्याने एका टू व्हीलर गाडी चे रूपांतर एका ट्रॅक्टर मध्ये केले असून त्या मुलाने फक्त कमीत कमी खर्चामध्ये ते ३० हजार रुपये मध्ये मोटरसायकलचे मोडिफिकेशन करून का सुंदर अशा ट्रॅक्‍टरची निर्मिती केली आहे. या ट्रॅक्टर बनवणाऱ्या मुलाचे नाव शुभम कात्रे असून तो अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वरूर जवळका गावातील.एका गोरगरीब कुटुंबातील आहे. या शुभम कात्रे या शेतकरी मुलाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या गावी आल्यानंतर एका मोटर सायकल ला अत्यंत आपल्या हुशारीने व बुद्धी कौशल्याने सर्व ट्रॅक्टर चे स्पेअर पार्ट जोडून व इंजिनची क्षमता वाढवून आपल्या शेती कामाच्या उपयोगाकरिता का सुंदर अशा ट्रॅक्‍टरची निर्मिती केली आहे. एका जुन्या राजदूत गाडी पासून त्यांनी हा अविष्कार केला असून याच्यामध्ये त्यांनी १७५cc चे इंजिन बसवले आहे तर गिअर बॉक्स मध्ये BAJAJ GC १००० चा वापर केला आहे हा ट्रॅक्टर तयार करताना त्यांना तीन ते चार महिन्याचा कालावधी लागला.
 
या ट्रॅक्टर पासून सर्व शेतीची कामे करणे.डवरी,वखारणे, शेतातील चारा आणणे, शेतातील गठुडी आणणे, इत्यादी कामे यापासून करता येतात या ट्रॅक्टरला मात्र फक्त ३० हजार रुपये खर्च आल्यामुळे आसपासच्या गावातील लोकांचा हा ट्रॅक्टर बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली असून हा ट्रॅक्टर तयार करणाऱ्या शुभम संजय कात्रे या नवतरुण शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या ट्रॅक्टरची निर्मिती केल्यानंतर युवा विश्व वारकरी सेनेचे चे हभप:-गणेश महाराज शेटे यांनी त्याचे अभिनंदन करून
कौतुक केले.
 
Dhiraj_1  H x W
 
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मेक इन इंडिया,मेड इन इंडिया, सुशील भारत, या अशा योजना राबवाव्यात असे सांगितले आहे सरकारने या गोष्टीकडे लक्ष घालून या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला प्रोत्साहन द्यावे व आर्थिक सहकार्य करावे. व सर्व नवतरुण युवकांनी यांचा आदर्श घ्यावा.
- धिरज (भाऊ) शिरसाट
पंचायत.समिती.सदस्य अकोट