स्वच्छता आणि नम्रतेचा आदर्श म्हणजे अमरावती येथील अच्युत महाराज हॉस्पिटल: गणेश महाराज शेटे

जनदूत टिम    05-Oct-2020
Total Views |
सोलापूर : अमरावती जिल्ह्यातील मार्डी रोड वर असणारे संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे माझ्या वडिलांना नेण्याचा माझा योग आला आणि तिथली व्यवस्था स्वच्छता आणि आणि पूर्ण स्टॉप बोलण्या विषयी नम्रता पाहून अक्षरशः भारावून गेलो माझ्या वडिलांना हृदयाचा झटका आला आणि सचिन देव महाराज त्यांनी मला सांगितले आपण कुठेही न जाता सरळ अमरावतीला या मी अमरावतीला हॉस्पिटल जवळ गेलो गेट बाहेर गाडी उभी केली स्वतः गेटवरील वाचमन बोलायला लागला आत मध्ये पेशंट आहे का हे म्हटले हो मग गाडी बाहेर ठेवू नका गाडी घेऊन आत मध्ये न्या पेशंट उतरवा दवाखान्या मध्ये डॉक्टरांना दाखवा आणि नंतर बाहेर गाडी लावून द्या मी तर त्या कंपाउंडर कडे पहातच राहिलो नाहीतर आजकाल एस पी पेक्षा हवालदार जास्त पावर दाखवतात दवाखान्या मध्ये प्रवेश करता बरोबर दोन्ही तर्फा उंच झाडे लावलेले आहेत.
 
Ganesh Maharaj_1 &nb
 
बाजूला सुंदरसे गार्डन बनवलेला आहे जणूकाही शेगावच्या आनंद सागर मध्ये आल्यासारखे वाटले पुरुषोत्तम भाऊ राऊत यांच्या माध्यमातून डॉक्टर मंडळ यांची भेट झाली डॉक्टर सोनवणे साहेब, भुतळा साहेब, धांदे साहेब डॉक्टर आहेत पण त्यांच्या सोबत बोलत असताना जणू काही बऱ्याच वर्षांची मैत्री असल्यासारखे आमच्यासोबत बोलत होते आणि आम्हाला अतिशय जिव्हाळ्याने मार्गदर्शन केले या दवाखान्यामध्ये हृदयाचा इलाज महात्मा फुले योजने अंतरगत मोफत केल्या जाते कोणत्याही प्रकारची आर्थिक लुबाडणूक पाहायला मिळाले नाही नाही तर सध्या कोरोना काळात काही दवाखान्यां मध्ये अतिशय अवघड परिस्थिती पाहायला मिळत आहे कुठे पैसे जमा केल्याशिवाय पेशंट घेत नाहीत, कुठे पेशंट मरण पावल्यानंतर सुद्ध जास्त पैसे उकळण्याचा उद्देशाने पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवल्या जातो, कुठे पेशंट मरण पावल्यानंतर पेमेंट जमा केल्याशिवाय डेड बॉडी मिळणार नाही असले प्रकार पाहायला मिळाले खरंतर अशी वागणूक पेशंटला देणे म्हणजे माणुसकीला काळीमा चाहे काही ठिकाणी डॉक्टर्स नर्स पेशंट सोबत त्यांच्या नातेवाईकांसोबत धड बोलत नाहीत.
 
मी सर्व ठिकाणचा विषय बोलत नाही पण बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडत असताना दिसत आहेत पण आज अच्युत महाराज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्स, वॉचमन, झाडू स्वच्छता करणारी मंडळी ही पगारी असून सेवाभावी वृत्तीचा आहे दवाखान्याच्या आत प्रवेश करता बरोबर संत अच्युत महाराजांची मूर्ती आहे आणि सर्व डॉक्टर कर्मचारी दवाखान्यामध्ये प्रवेश करता बरोबर आधी अच्युत महाराजांचे दर्शन घेतात इतर ठिकाणी फक्त दवा आहे पण इथे दवा व दुवा दोन्ही आहे बरीच मंडळी हृदयाच्या ऑपरेशन करिता शिर्डीचा आवर्जून उल्लेख करतात पण विदर्भातील जनतेला मी नम्र विनंती करेल संत अच्युत महाराजांनी आपल्या विदर्भातच एवढी व्यवस्था करून ठेवल्या नंतर शिर्डीला जाण्याची गरज तरी काय संत अच्युत महाराज आमच्या अकोट येथील संत वासुदेव महाराज यांच्या भेटीला नेहमी यायचे अशा या संत महात्म्याच्या अथक प्रयत्नातून उभारल्या गेलेल्या या हॉस्पिटलचा इतर हॉस्पिटल व्यवस्थापकाने आदर्श घ्यावा.