खासदार रक्षाताई खडसे यांचा चोपडा तालुका दौरा

जनदूत टिम    05-Oct-2020
Total Views |
जळगाव : खा. रक्षाताई खडसे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्डी येथील युवकांचा भाजपा पक्ष प्रवेश झाला व समर्थ सुकनाथबाबा मंदिर देवस्थान येथे जळगाव जि.प.महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राकेश पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन, तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अभ्यासिकेचे उदघाटन खा. रक्षाताई खडसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. नारोद-खरद येथे रस्ता काॅक्रिटकरणाचे भूमीपूजन ता. अध्यक्ष पंकज पाटील यांच्या
शुभहस्ते झाले.
 
Raksha Khadse_1 &nbs
 
तसेच घोडगाव,वाळकी-शेंदणी येथील पाऊस व वादळामुळे नुकसान ग्रस्त शेती शिवार केळी पिक पाहणी सर्व अधिकार्‍यांच्या सोबत बांधावर जावून केली यावेळी तहसिलदार छगन वाघ, गटविकास अधिकारी बी.एस कोसोदे, प्र. ता. कृषी अधिकारी आर आर चौधरी, मंडळाधिकारी आर आर महाजन आदि महसुल अधिकारी यांना खा. रक्षाताई खडसे यांनी त्वरीत पंचनामे करण्याचे अादेश सर्व दिलेत.
 
या दौऱ्यात जेष्ठ नेते व मा.पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, उ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील,जि.चिटणीस राकेश पाटील,चोपडा पं.स.भुषण भिल,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष व नगरसेवक गजेंद्र जैसवाल,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,ता.चिटणीस व सोशल मीडिया संयोजक भरत सोनगिरे सर,तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील सरपंच संघटना
यावेळी वर्डी चे भाजपा पदाधिकारी विकास शिंदे सर,युवामोर्चा उपाध्यक्ष विवेक गुर्जर,बारकु पाटील,शांताराम शिंदे, विनायक पाटील, विनोद न्हायदे इ. पदाधिकारी उपस्थित होते.
 
चोपडा शासकिय विश्राम गृह येथे शासकिय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली यावेळी सर्व शासकिय अधिकारी तसेच जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके,उ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, ता.अध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जि.चिटणीस राकेश पाटील, पं.स. उपसभापती भूषण भिल,शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील,चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय पाटील,ता.चिटणीस भरत सोनगिरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष तुषार पाटील,चंद्रशेखर पाटील,लक्ष्मण पाटील,संभाजी पाटील,गोपाल पाटील, सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,दिपक बाविस्कर,सुभाष पाटील,विकास शिंदे,सुशिल टाटीया,तेजस जैन,विवेक गुर्जर,राज घोघरे,कार्यालय मंत्री मोहित भावे,आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते व पत्रकार परिषद ही संपन्न झाली.