आईटीसीग्रांट मराठा हॉटेलमध्ये मनकासे ची दमदार एन्ट्री....!

जनदूत टिम    28-Oct-2020
Total Views |
मुबई : सदर हॉटेल मधील फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट वर कार्यरत असलेले कर्मचारी आणि कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मागील काही महिन्यांपासून कामावरून अचानकपणे काढून टाकले होते.
 
IT Hotel_1  H x
 
सदर कामगारांनी म.न.का.से सरचिटणीस मा गजानन नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज दि.२७/१०/२० रोजी गजानन राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली म.न.का.से च्या शिष्टमंडळने आय.टी. सी.ग्रांट मराठा हॉटेलला धडक दिली व हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा केली,सदर चर्चेत व्यवस्थापनाने म.न.का.से च्या शिष्टमंडळास सर्व कामगारांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. सदर चर्चेस हॉटेल व्यवस्थानेकडून जनरल मॅनेजर अतुल भल्ला व एच.आर.मॅनेजर धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
 
म.न.का.से तर्फे उपाध्यक्ष - राकेश तारापूरकर, निशांत(बाळा) गायकवाड, चिटणीस - सचिन पाताडे, आण्णासाहेब लोखंडे, रेमन कोळी, राज पार्टे, उपचिटणीस - श्रीधर चिकणे देशमुख कार्यकारिणी सदस्य ऋषी सावंत, अक्षय गोरे, तेजस सारंग व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. याप्रसंगी कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण आणि कार्याध्यक्ष संतोष धुरी यांचे मार्गदर्शन लाभले.