बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन - पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा

जनदूत टिम    28-Oct-2020
Total Views |
पुणे : कंत्राटी कामगारांना संबंधित कंत्राटदाराने दिवाळीत बोनस द्यावा, म्हणून महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही परिपत्रक काढले आहे. मात्र, प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून या परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही, असा दावा कंत्राटी कर्मचारी करत आहेत.
 
PMC_1  H x W: 0
 
दर महिना वेतनातून कापला जाणारा हक्काचा बोनस न मिळाल्यास आंदोलन करु, असा इशारा पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. पुण्यातील कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि सरचिटणीस मुक्ता मनोहर यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कंत्राटी कामगारांच्या पगारातून दर महिना १५०० ते ३०० इतकी रक्कम कापली जाते. तसेच नियमाप्रमाणे ८.३३ टक्के बोनस दिला पाहिजे. त्यामुळे आमची हक्काची ही रक्कम आम्हाला मिळावी, असे कंत्राटी कामगारांचे म्हणणे आहे.
 
दरवर्षी दिवाळीत अतिशय तुटपुंजी रक्कम कामगारांना बोनस स्वरुपात दिली जाते. त्यामुळे महापालिकेच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. तसेच कंत्राटी कामगारांची आर्थिक फसवणूक होते. याप्रकरणी पुणे महापालिकेने याची दखल घेतली नाही, तर ऐन दिवाळीत आंदोलन करु, असा पवित्रा पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि सरचिटणीस मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.