युटोपियन शुगर्स करणार ७ लाख मे.टनाचे गाळप, दूसरा हप्ताही लवकरच देणार:- उमेश परिचारक

जनदूत टिम    15-Oct-2020
Total Views |
सोलापूर : कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२०-२०२१ या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दि.१४/१०/२०२० रोजी चेअरमन उमेश परिचारक यांच्या सह हृषीकेश परिचारक व रोहन परिचारक,यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.
 
Dhugars_1  H x
 
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक सी.एन.देशपांडे,संचालक दिनेश खांडेकर,जनरल मॅनेजर तुकाराम देवकते,मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,चीफ अकौंटंट मुकेश रोडगे,चीफ इंजिनीअर पी.एस.पाटील, चीफ केमिस्ट दीपक देसाई,डिस्टिलरी मॅनेजर महेश निंबाळकर,यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.अगदी साध्या व कौटुंबिक पद्धतीने सदर कार्यक्रम पार पडला.
 
यावेळी बोलताना युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,युटोपियन चा हा सातवा गळीत हंगाम असून मागील सहा ही हंगामात युटोपियन ने विक्रमी उत्पादन केले आहे. गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गळीत झालेल्या ऊसासाठी दिवाळी भेट म्हणून लवकरच ऊसाचा दूसरा हप्ताही ऊस उत्पादकांच्या बँक खाती जमा करणार आहोत. पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,चालू गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊसाची नोंद आहे. मागील सर्व विक्रम मोडीत काढीत नवे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.सध्या सततच्या पाऊसामुळे चालू वर्षी ऊस तोडणी मध्ये विलंब होण्याची शक्यता असून चालू गळीत हंगाम हा लांबण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर असणार्‍या अडचणी मध्ये वाढ होत आहे.
 
अशा परिस्थितीत ही चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल व कारखान्याच्या आसवांनी प्रकल्पातून १ कोटी १५ लाख लिटर चे इथेनॉल चे उत्पादन करण्यात येणार आहे असा आशावाद परिचारक यांनी व्यक्त केला.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन शुगर्स च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी सत्यनारायण महापूजा श्री.व सौ. रूपक रणदीवे यांच्या शुभ-हस्ते करण्यात आली.तसेच काटा पूजन रोहन व हृषीकेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे सो
यांनी केले.