शिवसेना नेते प्रदीप मगर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार

जनदूत टिम    11-Oct-2020
Total Views |

ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे करण्यासाठी आवाहन

तुळजापूर : तुळजापूर तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांनी माफक दरामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करून दिली असून त्यांच्या या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
 
tuljapur_1  H x
 
तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने समाजकारण व राजकारण करणारे उपतालुकाप्रमुख प्रदिप मगर हे आपली परंपरागत शेती करतात शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळ यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सतत अडचणींना सामोरे जावे लागते परिणामी उत्पादन कमी होऊन आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. आर्थिक अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी आर्थिक तारांबळ होते, ही तारांबळ कमी करण्यासाठी माफक दरामध्ये शिवसेना नेते प्रदीप मगर यांनी स्वतः ट्रॅक्टर खरेदी करून माफक दरामध्ये शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा उपक्रम चालवला आहे.
 
tuljapur1_1  H
 
बाजारामध्ये मोठ्या किमतीत शेतकऱ्याला शेतीची कामे करावी लागतात. प्रदीप मगर यांच्या उपक्रमामुळे शेतकऱ्याला माफक किमतीमध्ये शेतीची कामे करण्यासाठी ही यंत्रसामग्री उपलब्ध केली आहे, त्यांनी हा उपक्रम सुरू केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यामुळे शिवसेना नेते मगर यांचा उत्साहदेखील वाढला आहे. भविष्यामध्ये आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे त्यांनी यानिमित्ताने सांगितले आहे.
 
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर कायमस्वरूपी या परिसरात सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यामधून ते गोरगरीब ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मदत करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्रॅक्टर सवलतीच्या दरात भाड्याने देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना माझ्या परीने थोडीफार मदत करण्याचा हा प्रयत्न केला आहे.
 
यामुळे शेतकऱ्याला शेतीची कामे करण्यासाठी लागणारा खर्च निश्चितपणे कमी होणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपली आर्थिक बचत करावी असे आवाहन या उपक्रमाचे प्रमुख शिवसेना नेते प्रदीप मगर यांनी केले आहे यासाठी त्यांनी संपर्क करण्यासाठी दिलेला मोबाइल क्रमांक हा देत आहे.