मीरा-भाईंदरमध्ये बंडखोर ‘किंग-मेकर’?

जनदूत टिम    24-Oct-2019
Total Views |
 
 
मुंबईशी संलग्न असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मीरा शहरामध्ये भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे विधानसभा निवडणुकीत येथील भाजपच्या बंडखोर उमेदवार आणि मीरा भाईंदर शहराच्या माजी महापौर गीता जैन यांनी हजारो मतांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे २० व्या फेरीनंतर अपक्ष उमेदवार गीता जैन यांना ६० ४०० मते मिळाली असून भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे त्यांना ३९ ३९४ मते मिळाली असून विजयी आघाडीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे तर महाआघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे असलेले काँग्रेसचे नेेते मुझफ्फर हुसैन यांना ३५ २४४ मते मिळाली आहेत त्यामुळे सध्याचे चित्र पाहता मीरा भाईंदरमध्ये बंडखोर किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र आहे